
दैनिक चालु वार्ता
ग्रामीण प्रतिनिधी शहादा
पुनम पवार
शहादा :- शहादा तालुक्यातील असलोद येथून दोघा अल्पवयीन युवकांचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात विरूद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील असलोद येथील ॠषिकेश ईश्वर पावरा(वय15) व पवन रामकृष्ण पवार (वय14) या दोघ अल्पवयीन युवकांना अज्ञाताने फूस लावून पळवुन नेले. याबाबत ईश्वर विनायक पवार यांच्या फियाॅदीवरून शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम 363प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक काळूराम चौरे करीत आहेत.