
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कळका :- येथील सामाजिक कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेड कंधार तालुका उपाध्यक्ष श्री.संभाजी तिरूपती पाटील गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पत्रकार दिन असल्यामुळे पेठवडज सर्कल मधील सर्व पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दैनिक चालू वार्ता पेठवडज सर्कल चे पत्रकार बाजीराव पाटील गायकवाड यांचा सत्कार करुन दैनिक चालू वार्ता च्या सर्व पत्रकार बांधवांना व मुख्य संपादक श्री. डि. एस. लोखंडे पाटील यांना पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानले.
ते म्हणाले दैनिक चालू वार्ता ने कंधार तालुका व परीसरातील गोरगरिबांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले व शेतकरी , कामगार, दिव्यांग, निराधार गरीबांच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवून अनेक लोकांना न्याय मिळवून दिला. त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याबद्दल त्यांनी दैनिक चालू वार्ता चे कौतुक केले आहे.