
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
नांदेड :- सकाळ माध्यम समूहाच्या यिन अर्थात यंग इन्सपिरेशन नेटवर्क तर्फे घेण्यात आलेल्या निवडणुकीत नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ रसायनशास्त्र संकुलातून विद्यार्थी भुजबळ मारोती यांची यिन च्या नांदेड जिल्हा संघटन मंत्री पदी तर धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील संतोष साखरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली.
जिल्ह्यातील 24 महाविद्यालयात अध्यक्ष उपाध्यक्षांची ऑनलाइन निवडणूक घेण्यात आल्या होत्या. निकाल हाती येण्यापूर्वीच मंत्रीपदी, अध्यक्षपदी , जिल्हास्तरावर कोणाची वर्णी लागणार याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता लागली होती. अखेर यशवंत महाविद्यालय नांदेड येथे निवड प्रक्रिया पार पडली. यासाठी लेखी परीक्षा, भाषण कौशल्य , तोंडी परीक्षा, व मतदान या तीन टप्प्यात घेण्यात आली यात महाविद्यालयातील उपाध्यक्ष मधून प्रथम क्रमांक भुजबळ मारोती यांनी मते मिळवली, तसेच महाविद्यालयातील अध्यक्ष मधून प्रथम क्रमांक संतोष साखरे यांना मते मिळाली. तसेच यावेळी जिल्हा शहराध्यक्षपदी साईनाथ सूर्यवंशी, नांदेड शहर महापौर पदी निकिता शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षपदी श्रीनाथ राऊत यांची निवड झाल्याचे कळताच समर्थकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. गजानन मोरे, यिन चे माजी मंत्री चक्रधर खानसोळे , यांनी काम पाहिले. तसेच यावेळी प्रा. डी भोसले, प्रा .बि आर भोसले यिन चे माजी मंत्री गौरव वाळिंबे, तुषार जाधव किरण लोंढे यांचे या प्रक्रियेत सहकार्य लाभले. या सर्व प्रक्रियेत यांचे जिल्हाधिकारी पवन वडजे यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली.
चौकट :- यिन माध्यमातून नेतृत्व करण्याची खूप मोठी संधी मिळाली. ग्रामीण भागातील महाविद्यालयाचे नेतृत्व करण्यासाठी जिल्हा संघटन मंत्री पदी निवड झाल्याने जबाबदारी वाढली आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयीन स्तरावर विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिलेल्या संधीचे 100% सोनं करण्याचा प्रयत्न करीन. -भुजबळ मारोती गोविंद पा. यिन संघटन मंत्री