
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- वर्तमानपत्रे दैनंदिन जीवनाचा आरसा असतात. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली तो दिवस दर्पण दिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.समृद्ध परंपरेत जनमाणस घडविण्यासाठी पत्रकार या नात्याने आपली भूमिका या व्यवस्थेत मोलाची आहे. देगलूर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष विशाल पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पत्रकार बांधवांचे पुष्पगुच्छ व लेखनी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष सुनील मदनुरे सर तसेच तरुण भारतचे पत्रकार शेख असलम सर दैनिक गाववाला पत्रकार बावगे सर. वाघमारे सर दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे सर कोकणे सर
आदी पत्रकार उपस्थित होते.