
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून ग्रामीण रुग्णालय कंधार चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर सर व पोलीस स्टेशन कंधार चे पोलिस निरीक्षक आर.एस.पडवळ साहेब यांच्या हस्ते पत्रकारांना पेन ,डायरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कंधार तालुक्यात प्रथमच पत्रकार दिनानिमित्त पोलीस स्टेशन येथे व ग्रामीण रुग्णालय येथे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. मागील काही वर्षांत आजपर्यंत कुठल्याही तालुक्यातील पोलिस ठाण्यात व रुग्णालयात पत्रकारांचा सत्कार पत्रकार दिनानिमित्त केला नाही परंतु आज कंधार पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ साहेब ,पी एस.आय.इंद्राळे साहेब व पोलीस कॉन्स्टेबल शेख इम्रान यांनी या उपक्रमाची सुरुवात करून आज दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा भेट वस्तू देऊन सत्कार केला.
तसेच ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर सर, डॉ. गुडमेवार सर व अन्य वैद्यकीय अधिकारी यामुळे या उपक्रमाची सुरुवात करून आज दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा भेट वस्तू देऊन सत्कार केला सर्व पत्रकारांनी पोलिस निरीक्षक आर.एस.पडवळ साहेबाचे व ग्रामीण रुग्णालय कंधार चे वैद्यकीय अधिकारी लोणीकर सरांचे आभार मानले तसेच या उपक्रमा बद्दल कंधार येथील पोलिसांचे व ग्रामीण रुग्णालय चे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी कंधार तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.