दैनिक चालु वार्ता
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
विश्वास खांडेकर
सिडको :- सिडको येथील एक अग्रगण्य शाळा म्हणून कुसुमताई महाविद्यालयाला ओळखले जाते. पहिली ते बारावी पर्यंत असणारे हे महाविद्यालय शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य विद्यालय म्हणून नांदेड शहरात प्रसिद्ध आहे. या विद्यालयात ‘संचालक मंडळ आणि शिक्षकांच्या’ अथक परिश्रमातून लसीकरणाची मोहीम देखील अगदी आघाडीवर राबवली जात आहे.
शिक्षणाची मांदियाळी म्हणून ओळखले जाणारे ‘कुसुमताई विद्यालय’ हे सिडको भागात संभाजी चौक या ठिकाणी आहे. एखाद्या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष व्हावा तसे हे विद्यालय आता वटवृक्षाप्रमाणे वाढले आहे. या विद्यालयात शिक्षण घेणे ही एक अभिमानाची गोष्ट मानली जाते, याठिकाणी विद्यार्थी, शिक्षक आणि संचालक मंडळ यांच्यात अगदी सुसंवाद आहे. येथील शिक्षण उत्कृष्ट आहे याबाबत येथील सचिव ‘संभाजी बिरादार’ सरांना याचे मुख्य क्रेडिट जाते. कारण त्यांनी आपल्या संस्थेसाठी उत्तम शिक्षकांची निवड केली, त्याप्रमाणेच येथील शिक्षकांनी देखील त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवला आहे.
शिक्षणासोबतच ही शाळा विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रगण्य म्हणून ओळखली जाते. या शाळेत आता लसीकरणाची मोहीम देखील मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे.
शाळा मोठी असल्यामुळे येथील विद्यार्थी संख्या जास्त आहे अशा वेळी येथील शिक्षकांनी घरोघरी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले आहे. वेळप्रसंगी काही पालकांना देखील त्या लसीकरणाचे महत्त्व त्यांनी समजून सांगण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.
यासाठी त्यांनी गेल्या तीन दिवसापासून अथक परिश्रम केले आहेत, जवळजवळ 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण अवघ्या दोनच दिवसात या शाळेत करण्यात आले. याकरिता येथील सरकारी दवाखान्यातील स्टापने देखील फार मोलाचे कार्य केले आहे, अगदी शिक्षकांच्या म्हणण्यानुसार सर्व नियम पाळून लसीकरणाला खुपच सहकार्य केले, त्यामुळे यांचा देखील सहभाग या लसीकरणात विशेष मानला जातो.
या लसीकरणा करिता कुसुमताई मा.व उच्च मा. विद्यालयातील स्टाफने’सरकार आणि सिडकोतील रूग्णालयाचे अभार मानले आहेत. या लसीकरणात श्री संभाजी बिरादार (सचिव) श्री कमलाकर जोशी (मु़ .अ) सौ शशिकला बिरादार (उपमुख्याध्यापक) सौ.सावते(पर्यवेक्षक) शेख निजाम गवंडगावकर (पर्यवेक्षक) श्री. जाधव एस. डी., हंबर्डे व्हि.ए, राठोड ए.एम.,वडजे एस.पी., कळसकर बी.जी., शेळगावकर सर,सोनाळे मॅडम,माकणे मॅडम,व युवराज शिंदे इतर शिक्षक व शीक्षकेतर कर्मचा-यानी परिश्रम घेतले.