
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :- येथील देगलूर नगरपरिषद देगलूर येथे पत्रकार दिनानिमित्त विद्यमान नगराध्यक्ष श्री मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी पत्रकार बांधवाना सन्मानित करण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांना नगरपालिकेत भव्यदिव्य असे कार्यक्रम आयोजित करून शाल, पुष्पगुच्छ व लेखणी देऊन सन्मानित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मोगलाजी अण्णा शिरशेटवार,प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार श्री.श्रीधर दिक्षित साहेब तसेच देगलूर-बिलोली मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री जितेश भाऊ अंतापूरकर,पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापुरकर, बांधकाम सभापती अनिल अण्णा बोनलावार, गटनेते शेख महेमुद, नगरसेवक सुशीलकुमार देगलूरकर,नगरसेवक नितेश पाटील, नगरसेवक शैलेश उल्लेवार,नगरसेवक प्रशांत दासरवार, मनोज तोटावार,पत्रकार नरहरी कोलगाने सर, शिवानंद स्वामी सर,गौतम बनसोडे सर,बालाजी नाईकवाडे सर,शेख मुल्ला सर श्याम वदेवार सर, विशाल पवार सर,शेख असलम सर,अनिल पवार सर,सय्यद समी सर, मिलिंद कवळगावकर सर,मिलिंद कुशावाडीकर सर,संतोष मंधरणे सर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.