
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा
वस्तू वा सेवा खरेदी करताना दर्जा किंमत, गुणात्मक वस्तूंची खरेदी करताना योग्यता पहिलीच पाहिजे, स्पर्धेच्या बाजारात ग्राहकांची लुबाडणूक मोठ्या प्रमाणात होत असते. वस्तूचा घसरलेला स्तर, नफेखोरीला आळा घालण्यासाठी शासन कायदे व दंडाची हत्यार राबवत असतात म्हणून ग्राहकांनी खरेदीत चौकस वृत्ती असावी, असे विचार जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी विषद करून ग्राहक हक्काचे द्वार २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या पुढाकाराने उघडल्याचे सांगितले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य नवनिर्वाचित विभाग अध्यक्ष, विभाग संघटक, नवनिर्वाचित लातूर जिल्हाध्यक्ष, लातूर जिल्हा संघटकांना नियुक्ती पत्र वाटप व नवनिर्वाचितांचा सत्कार प्रसंगी व लातूर जिल्हा संपर्क कार्यालय उद्घाटन, पदाधिकार्यांच्या निवडी वेळी झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सहसंघटक सौ.मेघाताई कुलकर्णी, ग्राहक पंचायतीचे नवनिर्वाचित औरंगाबाद विभाग अध्यक्ष सतीश माने मदनसुरीकर, विभाग संघटक प्रा. हेमंत वडणे, विभाग संघटक बालाजी लांडगे, नवनिर्वाचित लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. प्रल्हाद तिवारी, नवनिर्वाचित लातूर जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर, महानगराध्यक्ष जगदीश भराडीया आदी उपस्थित होते.
ग्राहक पंचायतीचे राजाध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी ग्राहक पंचायतीचे तत्त्वे व कार्य विषयी माहिती देत. आपल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या विभाग, जिल्हा व तालुका शाखा यांच्यावतीने ग्राहक चळवळ, ग्राहकांचे हक्क आणि अधिकार तसेच ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, ग्राहक चळवळीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील शाळा, कॉलेजमधील अधिक अधिक विद्यार्थ्यांना याबाबत माहिती द्यावी असे सांगितले. यावेळी राज्य सहसंघटक सौ.मेघाताई कुलकर्णी यांनी ग्राहक चळवळ पुढे नेण्यात ग्राहक पंचायतीच्या पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान आहे सांगितले. विभाग संघटक बालाजी लांडगे यांनी ग्राहक तीर्थ स्वर्गीय बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीची स्थापना करून ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती दिली.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे नवनिर्वाचित औरंगाबाद विभाग अध्यक्ष सतीश माने मदनसुरीकर, विभाग संघटक प्रा.हेमंत वडणे, नवनिर्वाचित लातूर जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.प्रल्हाद तिवारी, नवनिर्वाचित लातूर जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर यांना नियुक्तीचे पत्र राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या हस्ते व जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते देऊन राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड व जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानोबा केंद्रे, विवेक खरे, किशन शिंदे, भागवत धुमाळ, किशोर तिवारी इत्यादीने विशेष परिश्रम घेतले.