
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
रामेश्वर केरे
गंगापूर :- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा आहे. त्यामुळेच धार्मिक क्षेत्राच्या विकासकामांसाठी चंद्रकांत खैरे यांचे सदैव योगदान असते. मी देशभरात फिरत असतांना अनेक तिर्थस्थळ व संस्थानात आलेला अनुभव आहे. त्यांच्या प्रयत्नाने अनेक धार्मिक स्थळांचा कायापालट झाल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज यांनी केले. गंगापूर तालुक्यातील मौजे भिवधानोरा ता. गंगापूर येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीतील सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, माजी उपसभापती पोपटराव गाडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संतोष माने पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी मुकुंद जोशी, तालुकाधिकारी ऍड. ऋषिकेश धाट, सरपंच रामेश्वर चव्हाण, अप्पासाहेब चव्हाण, नानासाहेब वाघ, दादा चव्हाण, अप्पासाहेब पाचपुते, गोकुळ तांगडे, गणेश चव्हाण आदींसह शिवसैनिक व नागरीक उपस्थित होते.