
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर : तालुक्यातील येरगी येथे सरपंच संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, 03-जानेवारी रोजी नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.त्यामध्ये नेत्र तपासणी मध्ये शस्त्रक्रियेसाठी उदगीर च्या उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्या 87 रुग्णांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर 06 जानेवारी रोजी उदगीर च्या लायन्स नेत्ररुग्णालयात सर्व रुग्णांना संतोष पाटील व सर्व डॉक्टर यांच्या हस्ते चष्म्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी उदयगिरी लायन्स नेत्रालयाचे नेत्रतज्ज्ञ व अध्यक्ष मा.डॉ.आर. एन.लखोटीया, प्रशाशिक अधिकारी एस. एस.पाटील, नेत्ररोगतज्ञ डॉ. शितल पेदेवाड, नेत्ररोगतज्ञ डॉ गणेश जोगदंड, उपसरपंच बालाजी तलारवार, संदीप पाटील, इरवंत कालींगवार, शुभम मुरूडे, रुग्ण उपस्थित होते.