
दैनिक चालु वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
पंढरपूर :- प्राथमिक आरोग्य (ज्ञानवर्धिनी) केंद्र,तुंगत ता.पंढरपूर यांच्याकडून पञकार दिनाचे औचित्य साधून पञकारांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी दिलीप रणदिवे, विक्रांत पाटील, आरोग्य अधिकारी श्रीकांत नवञे, रणजित रेपाळ यांच्या हस्ते पञकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पञकारांना व्हीटॅमिन सीच्या गोळया, मास्क, कफ सिरप, बॅडीज पट्टी, टुथपेस्ट, आय.ड्रॉप, कालदर्शिका व पुष्पगुच्छ देऊन पञकारांना मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच गणेश रणदिवे (सहायक वनसंरक्षक) यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास दुशदर्शन संच (टीव्ही) भेट देण्यात आला.
दिलीप रणदिवे यांच्याहस्ते टीव्हीचे पुजन करण्यात आले. यावेळी पञकार चंद्रकांत माने, नेताजी वाघमारे, अंबादास वायदंडे, रविंद्र शेवडे, उत्तम बागल, विठ्ठल जाधव, अश्फाक तांबोळी, विकास सरवळे, सुधीर आंद, संजय रणदिवे, संतोष रणदिवे उपस्थित होते. संजय रणदिवे व रविंद्र शेवडे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रस्तावना डाॅ.श्रीकांत नवञे, सुञसंचालन संतोष रणदिवे तर आभार डॉ. रणजित रेपाळ यांनी मानले.