
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी
पुणे :- पिंपळे गुरव प्रभाग क्र. २९ मधील विविध विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये श्रीमती शेवंताबाई खंडोजी जगताप महापालिका शाळेचे भूमिपूजन, नव्याने उभारण्यात आलेल्या कै.बट्टूराव गेनूजी जगताप उद्यान, सुदर्शन नगर येथील स्व. मनोहर पर्रीकर भुयारी मार्गाचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले.
यावेळी (महापौर) उषा ढोरे, (उपमहापौर) हिरानानी घुले, (आमदार) लक्ष्मण भाऊ जगताप, (आमदार) महेश लांडगे, (माजी खासदार) अमर साबळे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, (माजी नगरसेवक) शंकर जगताप, (स्थायी समिती सभापती) नितीन लांडगे, (शिक्षण समिती सभापती) माधवी राजापुरे, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष सागर अंगोळकर, नगरसेवक शशिकांत कदम, महेश जगताप, संदीप कस्पटे, शत्रुघ्न काटे, विलास मडिगेरी, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माऊली जगताप, संजय जगताप, नगरसेविका उषा मुंढे, उज्वला गावडे, वैशाली जवळकर, निर्मला कुटे, आरती चौंधे, सविता खुळे, माई रोकडे, कमल कोळी, शीतल भालचिम, प्रतिभा टिळेकर, रेखा पाटील, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, महापालिका अधिकारी व कर्मचारी तसेच पिंपळे गुरव परिसरातील जेष्ठ नागरिक महिला भगिनी आम्हाला मार्गदर्शन करणारे जेष्ठ कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.