
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
वडनेर :- टाकरखेड जिल्हा परिषद सर्कलच्या सन्मानीय सदस्या सौ. सुनंदाताई वसंतराव भोजने यांच्या १५ वित्त आयोगाच्या निधीमधुन शेतरस्त्याच्या कामाचे भुमीपूजन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजुभाऊ एकडे यांचे हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना आमदार राजेश एकडे यांनी सांगितले की मी सर्वप्रथम एक शेतकरीपुत्र आहे व शेतीमधून शेतमाल आणण्याकरीता जर शेतीला रस्ता नसेल तर किती हाल व अपेष्टा कराव्या लागतात याची मला चांगली जाणीव आहे. उदघाटनप्रसंगी बोलत होते.आमदार राजूभाऊ एकडे शेंबा येथे आल्यानंतर सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात आमदार राजूभाऊ एकडे यांचा ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शेत रस्ता उद्घाटन प्रसंगी उपस्थित वसंतराव भोजने, शिवसेना जिल्हा उपप्रमुख, संजय सिंग जाधव,पं. स. सदस्य, नंदकिशोर खोंदले, सरपंच शेंबा. जगन्नाथ भोपळे,उपसरपंच. प्रवीण भिडे, सौ.विद्या ताई कैलास सुशीर, सौ.शीतल सुरेंद्र चौधरी ,विजय इंगळे, शेख बीबी परविन शेख जब्बार, सौ.अनिता निलेश बोरकर, सौ. आशा सुधाकर वराडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य शेंबा.श्री इंगळे साहेब शा. अ., श्री पी.के. राठोड सचिव ग्रामपंचायत शेंबा. तसेच ईश्वर पांडव,अतुल सुपे,अनिल पाटील,गजानन राव खोंदले, श्रीकृष्ण खोंदले,सुधाकर बोरकर, दामोदर वराडे, राजू इंगळे, प्रकाश खर्चे, रमेश सुशिर, मुन्ना वराडे, निलेश दाभाडे, रामा वानखडे, अनंता घोगले, गजानन दांडगे, गणेश खोंदले, संतोष बोरकर, इत्यादी गावकरी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश भिडे तर आभार प्रदर्शन सरपंच नंदकिशोर खोंदले यांनी केले.