
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
बुलढाणा :- covid-19 यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकीय व खाजगी शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात याव्यात व विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिले आहेत.
मागील आठवडाभरापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान मुंबई ठाणे नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामधील शाळा बंद केल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील वाढते कोरणा रुग्ण पाहता जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.