
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि वडेपुरी
मारोती कदम
दपशेड :- दापशेड येथील शेतकरी हे शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेती करणारे शेतकरी विश्वनाथ गोविंदराव होळगे या शेतकऱ्याने रासायनिक खताचा वापर शेतीत न करता शेतीच्या प्रयोगाला सुरुवात केलेली आहे. ते शेतामध्ये गाई व म्हशीचे शेणखत व मूत्र ,कचरा , पालापाचोळा, शेतीला खत म्हणून वापरतात. शेतामध्ये कसल्याही प्रकारचा रासायनिक खत टाकत नाहीत व कीटकनाशकाचाही वापर पिकावर करत नाहित.
या नैसर्गिक पद्धतीने शेती अवलंबलेली आहे आणि होळगे या शेतकऱ्याच्या आग्रहास्तव यांची विषमुक्त व नैसर्गिक शेती पाहण्यासाठी स्वतः जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब व जि. प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर साहेब हजर राहिले, होळगे यांच्या शेतातील पिकांचे त्यांनी निरीक्षण केले व जवळून नैसर्गिक शेती कशी असते हे पाहून त्यांची पीकपद्धती पाहून, त्यांचे उत्पन्न पाहून होळगे यांचे कौतुक केले व नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला पाहिजे यानिमित्ताने डॉ विपीन ईटनकर साहेब, व प्रवीण पाटील चिखलीकर साहेब ,यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले .
डाॅ.विपिन ईटनकर साहेब यांनी सांगितले की शेतकरी होळगे यांचा आदर्श सर्व शेतकरी मंडळींनी घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीने नैसर्गिक शेती केली पाहिजे. आज शेतीची आधुनिक पद्धतीने केली तरच शेतकरी हा चांगले उत्पन्न घेऊ शकतो, आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी यांचा आदर्श घेऊन शेती करावी व जास्तीत जास्त उत्पन्न मिळवावेअसे त्यांचे मत त्यानी व्यक्त केले .
प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांनी सुद्धा नैसर्गिक शेतीचे महत्त्व सांगत असताना नैसर्गिक पीक उत्पादनामुळे माणसाचे आरोग्य चांगले राहील, खाणार्यांना रोग होणार नाही, विषमुक्त भाजीपाला अन्नधान्य खाल्ल्यामुळे शरीर चांगले राहील आरोग्य चांगले राहील. आणि आयुर्वेदात सुद्धा विषमुक्त पिकांना फार महत्त्व आहे , आपण जे पिकावर कीटकनाशकाचा फवारा करतो त्यामुळे पीक ताजीतवानी दिसते, काही काळापुरते पण तेच आपल्या पचनशक्तीवर परिणाम करते व आपले आरोग्य धोक्यात येते.
त्यामूळे विषमुक्त शेती व नैसर्गिक शेती काळाची गरज झालेली आहे म्हणून दापशेड येथील विश्वनाथ होळगे या तरूण शेतकऱ्यांप्रमाणे सर्व तरुण मंडळींनी आदर्श घेऊन अशी विषमुक्त नैसर्गिक शेती केली तर जमिनीचा कसही वाढेल, आणि निरोगी राहू निरोगी राहिल्यामुळे आपली प्रतिकारशक्तीही वाढेल ,यामुळे आजच्या तरुण शेतकरी यांनी विषमुक्त आणि नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे असे मौलिक मार्गदर्शन प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले.
या कार्यक्रमाला सभापती आनंद पा शिंदे, उपविभागीय अधिकारी शरद मडलीक, कृषी अधिक्षक चलवदे , तहसीलदार व्यंकटेश मुडे साहेब ,कृषी अधिकारी घूमनवाड साहेब , माजी सभापती शकर पा ढगे, माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके, साईनाथ टर्के, संदीप मोरे, ऊध्दवराव पवार, विनायक काळे ,व गावातील सरपंच, वीरभद्र राजुरे, उपसरपंच व किशनराव टोणगे,बाळु सावकार, इतर नागरिक व गावकरी मंडळी उपस्थीत होते.