
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा:- नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी विपीन ईनटकर यांनी वाळु उपस्या संबंधित कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असता, सदरील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दिली असुन लोहा वाळु उपसा जोमात चालु असुन या वाळु उपस्याला महसुल प्रशासनाचा वरदास्त असल्याचे चित्र दिसुन येत असुन वाळु माफिया व महसूल प्रशासन “मी करतो मारल्यावानी तु कर लडल्यावाणी” असे चित्र लोहा तालुक्यात अनेक भागात पहावयास मिळत असुन, वाळु माफीयांना, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी व महसुल प्रशासनातील अधिकारी यांचा आशीर्वाद व वरदस्त असल्याचे चित्र लोहा तालुक्यात पहावयास मिळत असुन आहे.
लोहा तालुक्यात बेटसांगवी, शेवडी, पेनुर, अंतेश्वर, चिञायवाडी, भारसावडा, तालुक्यात अन्य ठिकाणाहुन वाळु उपसा बिहारी बाबुच्या सहाय्याने तराफ्या मार्फत जोमात चालु असुन या वाळु उपस्याला तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांपासुन महसुल प्रशासन हप्ते घेण्यात मग्न असल्याचे चित्र दिसुन येत आहे. जिल्हाधिकारी साहेब गोदावरी वस्ञहरण थांबवा, गंगापाञ, नदीपाञ वाचवा अशी सामन्य जनतेतुन हाक ऐकावयास मिळत आहे.
वाळु माफियांना नेमका आशिर्वाद कुणाचा ?
लोहा तालुक्यात भर दिवसा व राञभर वाळु उपसा होत असुन नेमका आशिर्वाद कुणाचा का वाळु माफियांवर कार्यवाही केली जात नाही. तहसीलदार, महसुल, प्रशासन वाळुमाफिया यांच्या संगनमताने हा वाळु उपसा जोमात चालु असल्याची चर्चा लोहा तालुक्यात जोरदार पहावयास व ऐकायला मिळत आहे. बेसुमार वाळु उपसण्याच्या धंद्यात, कोणाची वाहने, तर कोणी मजुरदारीवर कामासाठी, तर काही दिवस राञी लोकेशनसाठी सुशिक्षित बेरोजगारांचाही वाळु व्यवसायात शिरकाव झालेला दिसुन येत आहे.
अवैध वाळू उपस्यामुळे लोहा तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था
वाळुच्या टिप्परमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेती असल्याने पेनुर ते सुनेगाव पर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असून लोकप्रतिनिधी मुग गिळुन गप्प बसल्याचे चित्र दिसुन येत आहे, कारण या व्यवसायात लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते जास्त असल्याने लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. प्रशासशाचे अधिकारी राजकीय नेते यांचे नातेवाईक या व्यवसायात भागीदार असतात, तर काही जण वाळु माफियांना सोबत हितसंबंध ठेऊन असतात यामुळे तालुक्यात काहिना मुकसंपती असते, तर काही जण मुकपट्टी लावुन गप्प असतात. तालुक्यात काही अपवाद वगळता अनेक नेते मंडळी यांचे समर्थकच वाळु तस्करीच्या व्यवसायात असल्याने ते या विषयाकडे कानाडोळा करतात.
लोहा महसूल प्रशासनाचा वाळु माफियांना आशिर्वाद
लोहा तालुक्यात अवैध वाळू उपसा व्यवसायात डोळे दिपणारी उलाढाल होत असल्याने वाळु उपसा करत असताना जिल्हाधिकाऱ्यांचे पथक धाड टाकण्यासाठी येण्या अगोदर महसुल विभागामार्फतच तलाठी, मंडळ अधिकारी,यांच्यामार्फत वाळुमाफियांना, आपले गंगेतील तराफे, मजुर कामगार, ट्रक्टर, टिप्पर, जेसीबी, हटविण्याचे लोकेशन दिले जाते. लोहा महसुल प्रशासन या व्यवसायात समाविष्ट असल्याचे चित्र एकंदरीत दिसुन येत आहे.
वाळु वाहतूकमुळे अपघाताना निमंत्रण
भर दिवसा व रात्री वाळु वाहतूक करणारे टिप्परचे ड्रायव्हर हे मद्यपान करुन गाडी चालवत असताना नशेच्या भरात वाळुने भरलेला हायवा भरधाव वेगाने नेताना साधारण वाहनांना साईड पण देत नाही त्यामुळे अनेक वेळा अपघात पण घडतात. सदरील सर्व बाबींचा विचार करून नांदेडचे जिल्हाधिकारी विपीन ईनटकर यांनी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी सामान्य जनतेतुन होत आहे.