
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी द.नांदेड
बालाजी पाटील गायकवाड
नांदेड :- आज दिनांक 07/01/2022 रोजी स्वारातीम विद्यापीठ, नांदेड ने संशोधक विद्यार्थ्यांची P.hd.Course work परिक्षा, ही दिनांक 12 व 13 जानेवारी रोजी ऑफलाईन पध्दतीने आयोजित केली आहे. सध्या देशात तसेच महाराष्ट्रातही Omicron व Covid-19 प्रादुर्भाव लक्षणीय प्रमाणात वाढत असून, या संदर्भात राज्य शासनाने परिक्षा या ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच UGC ने 13 डिसेंबर 2021 च्या परिपत्रकानुसार Covid-19 च्या परिस्थितीत परिक्षा कशाप्रकारे आयोजित करण्यात यावेत या संदर्भात सर्व विद्यापीठांना निर्देश दिलेले आहेत.
या निर्देशाप्रमाणे प्रस्तुत विद्यापीठाने पदवी (UG) व पदव्युत्तर (UG) च्या परिक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या आहेत. परंतू संबंधित विद्यापीठाने P.hd.Course work परिक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजित केल्या आहेत. या परिक्षा दोन दिवस चालणार आहेत. या परिक्षेसाठी येणारे संशोधक विद्यार्थी हे महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तसेच इतर राज्यातले ही संशोधक विद्यार्थी आहेत.
Covid-19 ची परिस्थिती पाहता खालील बाबींचा विचार करावा.
1. अनेक संशोधक विद्यार्थी हे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, धुळे, यवतमाळ, उस्मानाबाद, बीड, इतर जिल्ह्यातील रहिवासी असुन, तसेच अनेक विद्यार्थी हे परराज्यातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील आहेत.
2.सर्व परिक्षार्थी Vaccination हे 100 % झालेले नाही.
3. परिक्षार्थीमध्ये इतर जिल्ह्यातुन येणाऱ्या अनेक महिला संशोधक विद्यार्थीनींचा समावेश आहे.
4. महाराष्ट्रातील एस.टी.संप तसेच येणाऱ्या परिक्षा कालावधीत प्रवासावरील संभाव्य निर्बंध लक्षात घ्यावेत.
5. परिक्षेसाठी आलेल्या परिक्षार्थी संशोधक विद्यार्थ्यांच्या जीवीताची जबाबदारी विद्यापीठ प्रशासन घेणार आहे ?
6. प्रस्तुत विद्यापीठाच्या परिक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केल्या आहेत, मग course work च्या परिक्षा ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्याचा अट्टहास का?
अशा प्रकारच्या समस्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करून माननीय महोदयांनी प्रस्तुत विद्यापीठ प्रशासनाला (P. hd. Course work) परिक्षा या ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचे निर्देश द्यावेत व परिक्षार्थी संशोधक विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे मत निवेदनाच्या माध्यमातून निवासी जिल्हाधिकारी श्री.कुलकर्णी साहेबांना निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी निवेदन देताना हणमंत कंधारकर, सिनेट सदस्य अजय गायकवाड, माझी सिनेट सदस्य श्री.कैलास राठोड सर, श्रीकांत बोकारे, एकनाथ पावडे, हनुमंत कुरे, समाधान हिंगोले आदी उपस्थित होते…