
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- इंडिया ओडेक्स अंतर्गत औरंगाबाद रँडोनिअर्स तर्फे आयोजित १००० किलोमीटरची ब्रेव्हेट्स डी रँडोनिअर्स मँडियाक्स (बीआरएम) स्पर्धेमध्ये औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे सहसचिव अतुल जोशी, मनीष खंङेलवाल, सचिन इनामदार व अन्य सायकलपटूंनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. नववर्षाच्या प्रारंभी (दि.१ जानेवारी) सकाळी ६ वाजता, ध्वजस्तंभ – क्रांतीचौक येथून या राईडला सुरवात झाली. आम्हाला १००० किमी करण्यासाठी ७५ तास दिले गेले होते. मार्ग = औरंगाबाद – मांजरसुमबा – तुळजापूर – परत औरंगाबाद – कन्नड – परत औरंगाबाद – नगर – आळेफाटा – कल्याण रोड -परत नगर – हुन औरंगाबाद परत आसा दिला होता. या राईडचे आयोजक नितीन घोरपडे होते .
सर्व ८ रायडर सकाळी ६ वाजता AS CLUB मार्ग सोलापूर हायवे वरून निघालो. सर्व Riders SR टायटल होल्डर होते. मस्त वातावरण होते सगळीकडे गुलाबी थंङीमुळे धुके पसरले होते. सर्वजण सोबत होतो, आणि ज्याची भीती असते तेच झाले आमच्या सोबत सचिन इनामदार याची सायकल आडूळ ला पंक्चर झाली आम्ही थांबलो व १५ मिनिटांत पंक्चर काढले, आणि पुढे निघालो. सर्वात आधी गेवराई येथे १०० किमी. ला थांबलो व नाश्ता केला व लगेच मांजर सुमबा दुपारी २ वाजता गाठले. सर्वांनच्या जेवण्याची वेळ झाली होती लवकर लवकर जेवणे केले व तुळजापूर च्या दिशेने निघालो वाटेत कॉफी व पाण्यासाठी थांबलो.
रात्री ८.३० तुळजापूर ला पोहचलो. तिथे नितीन सर आधीच पोहचले होते त्यांनी आमच्या कार्ड वर स्टॅम्प केला एक १० ते १५ मिनिट थांबलो व परत मांजर सुमबा च्या दिशेने निघालो रात्री चे ९.०० वाजले होते आणि १५ किमी. झाल्यावर जेवण्यासाठी जगदंबा हॉटेल मध्ये थांबलो व जेवण केले तेवढ्यात माझे लातूर चेबालमित्र गौरी, संगमेश्वर, व नितीन आले आणि त्यांनी आमचे स्वागत केले. कसलाही वेळ वाया न घालता आम्ही निघालो वाटेत माझी सायकल पंक्चर झाली कसे बसे ट्यूब बदलले व निघालो.
सकाळी ३.०० वाजता मांजरसुमबा येथे पोहचलो, लगेच झोपी गेलो व सकाळी ६ वाजता औरंगाबाद च्या दिशेन निघालो, साधारण औरंगाबादला आम्ही दुपारी ३ च्या आसपास पोहचलो. पुढे कन्नड ला जायचे होते आणि परत औरंगाबादला याचे होते आता धुळे हायवे लागला होता कन्नडला स्टॅम्प घेतला आणि रात्री ११ वाजता आम्ही AS क्लब ला पोहचलो तिथे आमचे अध्यक्ष मोहदय निखिल सर यांनी आमच्या जेवण्याची व्यवस्था केली होती आता आमचे संपूर्ण ७०० किमी. च्या आसपास झाले होते .
आता शेवटीचे ३०० किमी. हे नगर – आळेफाटा – नगर -औरंगाबाद करायचे होते. आम्ही रात्री मस्त जेवण केले आणि झोपी गेलो सकाळी ५ वाजता सर्व् रायडर्स उठले आणि सर्व तयारी करून नगर च्या दिशेने निघालो दुपारी ११ वाजता नगर ला पोहचलो नाश्ता केला आणि लगेच आळेफाटा च्या दिशेने निघालो तिथे नितीन सर हे आमची वाट पाहत होते. आता आमचे ८५० किमी.झाले होते. राहिले आता १५० किमी. पण हे १५० किमी. फार अवघड गेले कारण नगर औरंगाबाद रस्ता व रात्रीची हेवी ट्रॅफिक आम्ही ऑरेंज व्हॅली हॉटेल मध्ये रात्री जेवण केले व ९ वाजता नगर सोडले कसे बसे खड्डे चुकवत हळू हळु पुढे निघत राहिलो झोप जाण्यासाठी आम्ही कॉफी घेतली आणि (दिनांक ४ जानेवारी २०२२ ला सकाळी ३.१५ वाजता) औरंगाबादला पोहचलो. ३ दिवस ३ रात्र कधी कसे गेले समजले नाही.
सर्वांनी १००० किमी. BRM हे अंतर केवळ ६९ तास ३० मिनिटांत पुर्ण केले. हे यशस्वी लक्ष गाठण्यासाठी Practice करणे फार फायदेशीर ठरते. या मध्ये आम्हांला पाठबळ देणाऱ्या सर्व ADCA Members चे मनापासून धन्यवाद. तसेच नितीन घोरपडे सर, अविनाश आघाव सर, निखिल कचेश्वर सर, चरणजीतसिंग संघा सर, माऊली ढाकणे सर व माझे परिवार सदैव पाठीशी होती पार्थ व सई . अश्विनी खूप सोपोर्ट केला सर्वांचे मनापासून धन्यवाद .
दैनिक चालु वार्ता – औरंगाबाद विभागाचे जिल्हा प्रतिनिधी अनिकेत संजय पुंङ यांनी घेतलेली विशेष मुलाखत
( इंडिया ओडेक्स अंतर्गत औरंगाबाद रँडोनिअर्स तर्फे आयोजित १००० किलोमीटरची ब्रेव्हेट्स डी रँडोनिअर्स मँडियाक्स [ बीआरएम ] स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे सहसचिव अतुल जोशी यांची दैनिक चालु वार्ता – औरंगाबाद विभागाचे जिल्हा प्रतिनिधी अनिकेत संजय पुंङ यांनी घेतलेली मुलाखत व १००० किलोमीटर चे अंतर गाठतांना आलेले अनुभव . )