
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- माझ्या सहकार्यानो कोणत्याही शहरात राहतांना आपणही या शहराचा एक भाग होतो, जसे परिवारात आपली हृदयस्पर्शी नाते तयार होतात तशीच या शहरात देखील या नात्यांचे जाळे पसरलेले असते. इथल्या विविध सुख – दु:खाचे आपण साक्षीदार होतो. महत्त्वाचं म्हणजे घडणाऱ्या भल्या बुऱ्यालाही आपण तितकेच जबाबदार असतो. भविष्यातील आपल्या औरंगाबाद शहराकडे बघताना वर्तमानात कशी पावलं उचलावीत, काय करता येईल म्हणजे माझं शहर विकासात्मक दृष्टीने राहण्या योग्य होईल. तुमचे क्षेत्र – समस्या – उपाय यासाठी संवाद.
करिअर साधताना, अर्थार्जन करताना युवापिढीने आपण राहतो त्या शहराबद्दल विचार का करू नये ? नक्कीच केला पाहिजे, त्याने नुसता विचार करून थांबू नये तर तो विचार चार चौघांत मांडला देखील पाहिजे. समविचारी युवा एकत्र आले तर ते बदल नक्कीच घडवू शकतात. आपल्या सभोवताल काय चाललंय हे समजून घेऊ शकतात. हे करताना आपल्या शहराचं विकास नियोजन, शहरासाठीच्या विकास योजना, अनेक गरजा आणि त्यासाठीची योग्य दिशा सगळं ठरवू शकतात, पण त्यासाठी व्यक्त होणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं. मी ज्या शहरात राहतोय त्या शहराच्या विकासात मी देखील काही योगदान देऊ शकतो हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे .
एक वैशिष्ट्यपूर्ण आयोजन !
म्हणूनच ” तरुणाई सोबत…. शहरासाठी ! ” पहिल्यांदाच असा उपक्रम औरंगाबादेत होतोय. एक वेगळा प्रयोग (दि. ९ जानेवारी), सायंकाळी ६.३० वाजता, C.C.D. – समर्थनगर येथे काँफी विथ समीर, आपल्या शहरात पहिल्यांदाच एक दूरदृष्टी उपक्रम होतोय. माझं शहर राहण्यायोग्य व्हावं यासाठी . औरंगाबाद शहरात असा विचार होतोय ही चांगली गोष्ट आहे . कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच असला तरी देखील हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण याची टॅगलाईन… तरुणाई सोबत…. शहरासाठी ! ही आहे . या उपक्रमाचे आयोजक समीरजी राजूरकर हे आहेत .