
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :- वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून शहादा तालुक्यातील काथर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सध्या सर्वत्र धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करण्यात येत आहेत. यासाठी मोठा खर्च करण्यात येत आहे. अतिरेकी सजावट, फुगे फोडणे, मेणबत्त्या जाळणे, फटाके वाजवणे असा खर्च सध्या वाढदिवसाला करण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. मात्र सामाजिक आत्मभान कायम ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या बंद झाली आहे. क्वचितच असा उपक्रम पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काथर्दे खुर्द येथील उपशिक्षक तथा प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम गुंडेराव अलट त्यांचा मुलगा अथर्व यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता जिल्हा परिषद शाळेतील १०४ सर्व मुलांना स्कुल बॅग,खाऊ वाटप, शैक्षणिक साहित्य वितरित केले. यामध्ये मुलांना आवड निर्माण होण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केंद्राचे केंद्रप्रमुख दादासाहेब पाटील,पोलीस पाटील ईश्वर वळवी, उपसरपंच गणेश भिल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा भाऊ पवार, मुख्याध्यापक कुवर सर,शाळेतील शिक्षक वसईकर सर,वसावे सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह निर्माण झाला होता.दरवर्षी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील गरीब होतकरू मुलांसाठी नवीन उपक्रम राबवीत असतात. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल गाव स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.