
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या तर्फे घेण्यात येणार्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा-2021 जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत मनोविकास माध्यमिक विद्यालय कंधार चे चार विद्यार्थी पात्र झाले आहे. इयत्ता पाचवी वर्गातील कु. आयुष कैलास डोम्पले हा जिल्ह्यातील शहरी भागातून गुणवत्ता यादीत 200 विद्यार्थ्यांतून तिसरा आला आहे व तालुक्यातून तो प्रथम क्रमांकावर गुणवत्ता यादीत नोंद झाला आहे. तसेच कु.साईनाथ केरबा मुलूकपडे (133 वा), कु.ईश्वर नागोराव कदम(143 वा) कु.अवधूत सचिन परभणीकर हा 166 वा आला आहे.
संस्थेच्या वतीने या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ऍड.बाबुराव पुलकुंडवार साहेब यांच्या हस्ते गुणवत्ता विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला व संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांना, शिकवणाऱ्या शिक्षकांना व पालकांना शुभेच्छा देण्यात आले त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री लुंगारे सर उपमुख्याध्यापक श्री बंडेवार सर व सर्व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.