
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या येनोरा येथील भुंबर कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करावी. या मागणीसाठी मराठा सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यात अनेकांनी बलिदान दिले आहे.
शासनाने बलिदान दिलेल्या ३४ व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केले आहे. परंतु यात परतूर तालुक्यातील येनोरा येथील भुंबर कुटुंबाचा समावेश नाही. कुटुंबामती व्यक्तीने मराठा आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिल्याने त्यांच्या वारसांनाही शासनाच्या निर्णयानुसार आर्थिक मदत मिळणे अपेक्षित असताना त्यांना आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून मदत देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सदाशिव भुंबर कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी मराठा सेवा संघाने आंदोलन केले. आर्थिक मदतीसाठी तत्काळ शासनाकडे प्रस्ताव पाठवून कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.