
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
जालना :- राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील शुक्रवारचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री देखील कोरोना बाधित होत असल्याचं समोर आलं आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. रावसाहेब दानवे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ते सध्या सायसोलेशनमध्ये आहेत.