
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी :- पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी व महात्मा जोतिबा फुले या राष्ट्र महापुरुषांच्या स्मारकाच्या देखभालीसाठी उद्यान कर्मचारी व सुरक्षारक्षक कर्मचारी यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी आशोका बहुउद्देशीय संस्थेच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान पूर्वी जे कर्मचारी होते. ते आता दुसरीकडे पाठवल्याने स्मारकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे दोन्हीही स्मारकाची जबाबदारी खूप मोठी असल्यामुळे रात्री किमान दोन सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात यावी व उद्यान साफसफाई कर्मचारी कायमस्वरूपी नेमण्यात यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.
दरम्यान या शिष्टमंडळात अशोका बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनोज गजभार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग वरिष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत बोचकुरे, वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहर सचिव सिद्धार्थ शिरसाठ, तायाम्मा तलवार सामाजिक संस्थेचे संस्थापक सुनील तलवार, एस. के. सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते बाबू भंडारी, अशोका बहुउद्देशीय संस्थेचे खजिनदार रवी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे इत्यादी मान्यवरांचा या शिष्टमंडळात समावेश होता.