
दैनिक चालु वार्ता
भूम तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- विज पुरवठा पूर्ववत करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल यांच्या आदेशाने निवेदन देण्यात आले.निवेदाद्वारे असे म्हटले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पंपाची कनेक्शन बंद केले आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून,पीक वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे.याच कारणाने पूर्ण शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.या प्रश्नावर मा.अभियंता काळे महावितरण कंपनी कार्यालय भूम यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडण्यात आले.विज पुरवठा पूर्ववत नाही केला,तर येत्या दि.१५/१/२०२२ आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड, तालुका अध्यक्ष मुसा भाई शेख ,तालुका उपाध्यक्ष महावीर बनसोडे, शेकापुर शाखाध्यक्ष सादीक सय्यद, अनिस शेख, अहमद पठाण, अमर बादेला,अक्की गायकवाड ,सिद्धेधन सरवदे, स्वप्नील शिंदे,विक्की बनसोडे,नवनाथ महानवर, आकाश गायकवाड,शंकर गोयकर,सलमान पठाण,रमजान सय्यद,जावेद पठाण,आश्रुबा दाखले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.