
दैनिक चालु वार्ता
सिल्लोड प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :-भारतातील पहिल्या महिला शिक्षीका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रीयांना उजेडाजी वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व पोलिस स्थापना दिनानिमित्त ज्ञानविज्ञान विद्यालयात भराडी ता. सिल्लोड येथे दामिनी पथकाच्या साह्यक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगयांनी महिला व मुलींच्या संरक्षणाबाबत जनजागृती पर सखोल असे मार्गदर्शन केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पोलिस क्षेत्रा विषयी सांगतांना दामिनी पथका विषयी सविस्तर मार्गदर्शन करतांना महिला व मुलींना आता घाबरायचे नाही. कोणी तुमची छेड काढत असेल त्रास देत असेल तर त्या विषयी कोणाला न घाबराता सांगा, अशांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा या वेळी देण्यात आली. स्त्री आता मागे नाही, अनेक क्षेत्रात काम करत आहे. ” नारी सबसे भारी ” असल्याचे मत नालंदा लांडगे यांनी व्यक्त केले.