
दैनिक चालु वार्ता
सिल्लोड: प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :- तालुक्यातील रब्बी प्रकल्प व क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा मका, ज्वारी, सुर्यफुल, ऊन्हाळी सोयाबीन इ. पिकांची पहाणी बुधवारी कृषी शास्त्रज्ञ सूर्यकांत पवार, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. सिल्लोड तालुक्यातील मोढबुद्रुक, वांजोळा, केराळा, भवन, गेवराई सेमी, दहिगांव, डिग्रस, गोळेगांव आदि ठिकाणी भेट दिली. हरभरा पिकांमध्ये एकात्मिक किड व्यवस्थापना साठी पक्षी थांबे, निंबोळी अर्क, कामलिंग सापळ्यांचा वापर करावा, व आर्थिक नुकसानीच्या पातळीवर किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर किटकनाशकाचा वापर करावा.
तसेच रब्बी हंगामातील सोयाबीन पिकाची पेरणी शेतकरी बांधवांनी तापमान १५ डिग्री सेल्सिअस घ्या वर झाल्यावरच करावी बिजोत्पादना करिता उन्हाळी सोयाबीन पेरणी १५ ते २० जानेवारी पुर्वी करावी असे आवाहन यावेळी शेतकरी बांधवांना करण्यात येत आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी पाडळे, दापके, कृषी पर्यवेक्षक मुंढे, कृषी सेविका सारीका पाटिल, योगीता मनसोटे, समाधान गुळवे, भोळे, अनिल सोनवणे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.