
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- मुखेड कंधार मार्ग क्रमांक 104 वरील ग्रामपंचायत कमळेवाडी तालुका मुखेड शिवारातील पूल क्रमांक 42 मुळे होणाऱ्या शेतकर्याचे मुखेड पासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर शेत असून शेताच्या पूर्वेस ओहोळ आहे या ओहोळाचे पाणी दक्षिण-उत्तर वहाते आणि याआहोळावर सध्या सुरू असलेल्या नवीन पुलाच्या खालून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या उत्तर दिशेला त्या शेतकऱ्यांची शेत असून नवीन फुलाच्या भिंती पाण्याच्या वाहत्या प्रवास समांतर नसून त्यांची दिशा शेताकडे आहे.
फुलांच्या भिंतीमुळे फुलांच्या खालून येणाऱ्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे सुपीक शेती चा मातीचा बांधा कुठून त्या शेतकऱ्याच्या खाजगी मालकीच्या शेती जमिनीतील पिका सहा नुकसान होऊनकुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. तसेच वर्षा ऋतूत पूर परिस्थिती उद्भवल्यास त्या शेता मालकाच्या सुपीक शेतात पुलाखालून येणारे आणि शेतात घुसून मातीची मोठ्या प्रमाणात दूध होऊन वाहित शेती कसून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मातीच्या यूपीची नुकसान भरपाई कोणीही करू शकत नाही याची जाणीव आपल्याला आहेच. त्यामुळे जमीचा कस बिघडेल शिवाय बांधायला लागूनच त्या शेतकऱ्याची विहीर आहे. वेळोवेळी कार्यालयाला निवेदन त्या शेतकऱ्याने देऊन पण उडवाउडवीची भाषा करणारे कर्मचाऱ्यांमुळे त्या शेतकऱ्याला उपासमारीची वेळ आली आहे तरी त्या शेतकऱ्याने प्रशासनाला विनंती केली की त्याचे झालेले नुकसान लवकरात लवकर त्याला मिळावे आणि त्या पुलाच्या बांधकामाची पुनर्रचना करावी अन्यथा 26 जानेवारीला तो तहसीलदार कार्यालयासमोर कुटुंबासहित अमर उपोषणाला बसण्याचे सांगितले आहे.