
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
औरंगाबाद :- एसटी महामंडळातर्फे शुक्रवार दि.७ रोजी, १२९ बसच्या माध्यमाने तब्बल ३७८ फेऱ्या करण्यात आल्या. यात साडेपाच हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी दिली आहे. वारंवार सुचना करूनही कामावर रुजू न झालेले आणखी दोन कर्मचारी शुक्रवारी बडतर्फ करण्यात आल्याने एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ३८ झाली आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे या मागणीसाठी सुरु असलेला संप अद्यापही सुरुच आहे. असे असले तरीही काही प्रमाणात सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमाने एसटीने आपली सेवा सुरु केली आहे. तसेच प्रशासनाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती पत्कारलेल्या माजी चालकांना करार पध्दतीने नेमणूक करण्याची तयारी सुरू केली आहे. यासंबंधी महामंडळाने बुधवारी दि.५ रोजी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यांनतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १८ ते २० सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे अर्ज आले आहेत.
#