
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
नांदेड :- आज दिनांक 08-01-2022 रोजी- तरोडा खु. परिसरातील अष्टविनायक नगर ते स्वामी विवेकानंद नगर मध्ये नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून रस्त्यासाठी दहा लक्ष तर अष्टविनायक गणपती मंदिरा समोर पेव्हर ब्लॉक साठी सात लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याच विकासकामांचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच शिव पार्वती मंगल कार्यालयाकडे जाणार्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
नांदेड उत्तर मतदारसंघात आ. बालाजी कल्याणकर यांची अनेक विकास कामे सुरू आहेत. शनिवारी तरोडा खु. परिसरातील अष्टविनायक नगर मध्ये दोन कामांचे भूमिपूजन करण्यात आले तर एका कामाचे लोकार्पण करण्यात आले. अष्टविनायक नगर ते स्वामी विवेकानंद नगर मधील मुख्य रस्त्यासाठी आ. बालाजी कल्याणकर यांनी आपल्या स्थानिक आमदार निधी मधून दहा लक्ष रुपयांचा निधी दिला आहे.
तसेच अष्टविनायक गणपती मंदिरा समोरील मोकळ्या जागेवर पेव्हर ब्लॉक करण्यासाठी स्थानिक आमदार निधीमधून सात लक्ष रुपये निधी दिला आहे. या दोन्ही कामाचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तर शिवपार्वती मंगल कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यासाठी आ. बालाजी कल्याणकर यांनी स्थानिक आमदार निधी मधून पाच लक्ष रुपये निधी दिला होता. या रस्त्याचे देखील लोकार्पण करण्यात आले.
अष्टविनायक गणपती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक करावेत, अशी मागणी रहिवाशांनी आ. कल्याणकर यांच्याकडे केली होती. याची आ. कल्याणकर यांनी तात्काळ दखल घेऊन या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे रहिवाश्यांनी आ. बालाजी कल्याणकर यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला. या सत्कार समारंभात बोलताना आ. बालाजी कल्याणकर यांनी मी या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास करणार आहे. आगामी काळात देखील आपल्या परिसरातील सर्वच रस्ते करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, बांधकाम विभागाचे एस.बी. नरमीटवार, अष्टविनायक गणपती मंदिराचे अध्यक्ष प्रकाश पोपळे, सचिव कुलदीप जोशी, सुनील सातारे, किशोर पाठक, पांडुरंग गुट्टे, भानुदास मेड, कन्हयालाल शर्मा, मुकुंद खानापुरे, विजय सुर्यवंशी, मारोती पवार, दिगंबर कल्याणकर, प्रणव बोडके, निखील भोकरे, क्रष्णा राठोड, चंद्रकांत वानखेडे, विजय पौळ, शुभम पत्तेवार, करण शिंदे, ओमकार यादव, ज्ञानदेव घुगे, शारदा माडंवीकर, रुकमीनी बस्वदे यांच्यासह आदीजण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयंत वाकोडकर यांनी केले.