
दैनिक चालु वार्ता
देगलूर / प्रतिनिधी
देगलूर :- देगलूर तालुक्यातील वझरगा येथील जि.प.प्रा.शाळेत काँग्रेस कमिटी वझरगा च्या वतीने जि.प.शिक्षण व क्रीडा समिती स्विकृत सदस्य मा.श्री.बस्वराज पाटील वन्नाळीकर यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.स्विकृत सदस्य तथा मुख्याध्यापक मा.श्री.बस्वराज पाटील वन्नाळीकर, माजी सभापती भगवान जालने, सरपंच रुक्माजी औरादे, मारोतराव पाटील, वसंत सुर्यवंशी, गंगाधर कोकणे,माधव सुर्यवंशी, ज्ञानेश्वर कोकणे, माणिक सुर्यवंशी, बालाजी टाकळे, विठ्ठल कोकणे, विकास सुर्यवंशी,जि.प.प्रा.शाळेचे सौ.देवकत्ते मॅडम,सौ.कांबळे मॅडम,सौ.मिरागळे मॅडम यांसह काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.