
दैनिक चालु वार्ता
भूम तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भुम :- केंद्रीय प्राथमिक शाळा सुकटा येथे शालेय व्यवस्थापन समितीची दि ८ रोजी निवड करण्यात आली.या वेळी सर्व उपस्थित पालकांमधून चर्चा होऊन अध्यक्ष उपाध्यक्ष व नवनिर्वाचित सर्व सदस्य यांची निवड करण्यात आली.अध्यक्ष म्हणून रणजित रामलींग भडके तर उपाध्यक्षपदी स्वाती दत्तात्रय पांढरे यांची निवड करण्यात आली.
तर सदस्य म्हणून सुरेखा जाधव ,दत्तात्रय करडकर,रेश्मा शिंदे,अनिल साळवे,जयश्री खांडेकर, कुंडलिक भारती,प्रियंका गलांडे,अमोल गलांडे, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक प्रतिनीधी चंदा तांबारे,राजशेखर गलांडे,संचिता नाईकवाडी विद्यार्थी प्रतिनिधी,जयेश रोकडे सचिव वरील प्रमाणे समितीची शालेय समितीची निवड झाली असून याचे सर्व ग्रामस्था मधून अभिनंदन करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व शिक्षक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.