
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
चंद्रपूर :- चंद्रपूर मधील बाबुपेठ येथे लुबींनी नगर येथील एका गड्ड्यात दलदल मध्ये फसून मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या म्हशी च्या वासराला आम आदमी पार्टी बाबूपेठ चा कार्यकर्त्यांनी जीवन दान दिले. बाबुपेठ परिसरातील प्रभाग क्रमांक १७ येथिल लिंबीनी नगर, आंबेडकर नगर, हिंगलाज भवानी वॉर्ड, विक्तू बाबा चौक, दर्या नगर या वर्डात मोठ्या प्रमाणात विटा भट्टीचे, चूनखडीचे गड्डे आहेत ज्यामुळे येथे जाणमालाची नुकसान होत असते याबाबत आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजू भाऊ कुडे येथील जनतेला सोबत घेऊन वारंवार महानगर पालिकेच्या निदर्शनात आणून देत राहिले आहेत.
तरी सुध्दा महानरपालिकेने याकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे, जर हे गड्डे तात्काळ बुजवले गेले नाहीत तर आम आदमी पार्टी बाबूपेठ तर्फे प्रभाग क्रमांक १७ मधील जनतेला सोबत घेऊन मनपा प्रशासन विरोधात रस्त्यावर उतरेल आणि यास मनपा प्रशासन जबाबदार राहील असे आप चे शहर सचिव राजू कुडे यांनी म्हटले आहे. आज एक जीवित हानी होण्या पासून वाचविण्यात आप ला यश आले याकरिता आप चे शहर सचिव राजू भाऊ कूडे, बाबा नगर चे शाखा अध्यक्ष सागर बोबडे, कालिदास ओरके यांनी मोलाचे योगदान दिले.