
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी द.नांदेड
बालाजी पाटील गायकवाड
नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने पी.एच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी कोर्स वर्क परीक्षा हि दि.१२ व १३ जानेवारी रोजी ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा आता कोरोनाच्या पार्शवभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त असे की, पेट-२०२० या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्क परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार दि.१२ व १३ जानेवारी २०२२ रोजी या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार होत्या. पण तासिका मात्र ऑनलाइन पद्धतीने झाल्या होत्या.
विद्यापीठ प्रशासन ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी ठाम भूमिका होती. मात्र सध्याची कोरोनाची व ओमिक्रोन या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव वाढत असून,या परीक्षेसाठी महाराष्ट्रातुन विद्यार्थी येतात. त्यामुळे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, अथवा ती रुद्ध करावी,यासाठी ऑफलाईन परीक्षांच्या निर्णयाचा विरोध युवा संघर्ष शक्तीच्या वतीने हनुमंत कंधारकर यांनी केला. विरोधात विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलनही करण्यात आले होते.
तसेच या संदर्भातील निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब यांनाही देण्यात आले होते. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने कोर्सवर्क परीक्षा पुढे ढकलण्या संदर्भात परिपत्रक काढले आहे. ही मागणी मान्य करून विद्यार्थ्यांचे होणारे जीवित व आर्थिक नुकसान टाळल्याबद्दल विद्यार्थी नेते हणमंत कंधारकर यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आहेत.