
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मोखाडा
अनंता टोपले
मोखाडा :- पूर्वीच्या ठाणे आणि आताच्या पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून मोखाडा तालुक्याकडे पाहिले जाते कुपोषण, बाल मृत्यू,माता मृत्यू, पाणी टंचाई,रोजगारा साठी स्थलांतर इत्यादी ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्या नंतर आजही येथे आहेतच,या मुळे विकासाची गंगा आदिवासींच्या झोपडी पर्यंत जावी ही संकल्पना किंव्हा वलंग्ना करूनच कदाचित ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केली, या आधी जव्हारला उपजिल्ह्याचा दर्जा देऊन आदिवासींच्या विकासा साठी अशी गोंडस घोषणा करून कारभार चालू होताच.
मात्र विकास तर सोडाच साध्या साध्या मूलभूत गरजांसाठी आजही येथील बांधवांना झगडावे लागते आहे,शासन कोट्यवधी निधी या भागाला देत आहे त्यातून किती विकास झाला आणि किती होणार आहे तसेच नेमक कुणाचा हे प्रश्न अनत्वरितच असले तरीही विकासाची गंगा दारोदारी पोहचवण्यासाठी जी प्रशासनाच्या कामे करायला हवीत त्यांची किती आबाळ आहे याचे विदारक चित्र मोखाडा तालुक्यातील सर्व कार्यालयातील पदांचा अभ्यास केल्यास समोर येईल, या मुळे खरे तर ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ असे म्हणण्याची वेळ येथील परिस्थितीने सर्व सामन्यानवर आणली आहे.
तालुक्यातील मुख्य कार्यालय म्हणून आपण तहसील कार्यालया कडे पाहतो मात्र तहसील कार्यालयात महत्वाच्या महसूल आणि संजय गांधी निराधार योजनेच्या विभागातील नायब तहसिलदार पद रिक्त आहे. या मुळे या महत्त्वाच्या खात्यांचा अतिरिक्त कारभार दुसऱ्या अधिकाऱ्यांना देऊन कारभार ढकलला जात आहे महसूल सहाय्यक(लिपिक) म्हणून असलेल्या १३मंजूर पदामधून तब्बल ५ पदे रिक्त आहेत. तर शिपाई पदे ५ पैकी ३ पदे रिक्त आहेत या मुळे कोणी कोणत्या साहेबांन कडे थांबायचं याचीच आबाळ झाली आहे.
या नंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तहसील सम्बधित सर्वात जास्त कामे पडत तलाठ्यांच्या मंजूर १० पदा पैकी फक्त ५ तलाठी पदे भरल्या मुळे ऐका ऐका तलाठ्या कडे दोन अतिरिक्त भार असल्यामुळे गावनिहाय बारी लावून कामे करावी लागत आहेत या मुळे बरीचशी कामे रखंडताना दिसून येतात कारण प्रत्येक शेतकऱ्याला अतिशय महत्त्वाच्या कामाबरोबरच तलाठ्यांना अनेकदा पंचनामे, खोदकाम रॉयल्टी, अवैध रेती उपसा अशी कामे करावी लागतात.
यामुळे तब्बल २७ ग्रामपंचायतीची कामे फक्त ५ तलाठ्यां वरती आहेत त्यातल्या त्यात भूमाफिया,मोठे शेठ,सावकार यांच्या कामांना प्राधान्य द्यावे लागत असल्याने सर्व सामान्यांची कामे करणार कोण असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या बरोबर कोतवाल एकूण १० पदापैकी ४ रिक्त तर पहारेकरी स्वच्छक यांचीही प्रत्येकी १ पदे रिक्त आहेत अशी एकट्या तहसील कार्यालयातील परिस्थिती असल्यामुळे आम्ही विकास करू म्हणणाऱ्या प्रशासनाला नेमक्या कोणाच्या भरवशावर विकास करणार आहात असा प्रश्न या ठिकाणी सर्व सामान्य जनता विचारल्या शिवाय राहणार नाही.