
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- नांदेड जिल्हासह राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आव्हान जिया ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संकटापुर्वी पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव व ओमायक्रॉन हा नवा विषाणू राज्यात वेगाने पसरत आहे. त्यावर मात करण्यासाठी ३ जानेवारीपासून राज्यात सर्वत्र पंधरा ते अठरा वर्षांपर्यंतच्या तरुणांना लसीकरण करण्यात येत आहे. याचा या वयोगटातील विद्यार्थी मुला, मुलींनी स्वतः पुढाकार घेऊन न घाबरता आपले लसीकरण करून घ्यावे शहरी भागातील शिक्षकांनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी कोरोना लसीकरण विषयी जनजागृती करावी व इतरांना ही लसीकरण करून घेण्याकरीता प्रेरित करावे, असे आवाहन जिया ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी केले आहे.
राज्यभरासह शहरे, सर्व खेडे गाव, वाड्यावस्त्या, तांड्याच्या विद्यार्थांनी लसीकरण करून आदर्श सर्वांसमोर ठेवावा. प्रत्येक गावच्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध असून लसीकरण करून घ्यावे. नांदेड शहरातील विद्यार्थांनी ही लसीकरण केंद्रावर जाऊन आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. तसेच ज्या-ज्या अठरा वर्षांच्या पुढील नागरीकांनी अजुन एक ही लसीकरणाचा डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांनी ही लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन असे आव्हान जिया ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे.