
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :- मौजे कावळगाव येथील सेवा सहकारी संस्था या संस्थेचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2021 ते 2026 ची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्वसाधारण प्रतिनिधी मतदार संघातून आंगडे हणमंत म्हादप्पा 75 मत,जंगेवाड मारोती नागा 76 मत,देशमुख बाबाराव सोनाजी 78 मत देशमुख बाळासाहेब सदाशिवराव 76 मत,येलबुगडे सूर्यकांत विठ्ठल 74 मत,येसके दिगंबर विरभद्र 77 मत,वंटे भीमराव विठ्ठल 76 मत,शिवपूजे मारोती शिवराम 75 मत व महिला प्रतिनिधी मतदार संघातून देशमुख साधनाबाई बाळासाहेब 80 मत,पिटलेवाड कोंडाबाई नामदेव 79 मत,अनुसूचित जाती व जमाती मतदार संघातून वाघमारे महादाबाई दिगंबर 83 मत घेहून विजय मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पँनल चा एकहाती विजय झाला. विजयी उमेदवारांचे सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार,तालुका अध्यक्ष ऍड.अंकुश देसाई देगावकर यांच्या वतीने सर्व विजयी उमेदवाराचे सत्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, शशांक पाटील मुजळगेकर,तसेच सर्व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.