
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- ओरिऑन सिटीकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मेंदूवरील कन्टूर डिव्हाईसची पहिली जटील शस्त्रक्रीया यशस्वी करण्यात आल्याची माहिती मेंदूरोग विभागातील डॉ. पांडूरंग वट्टमवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. लातुर येथील ६२ वर्षीय महिला हॉस्पिटलमध्ये अत्यावस्थेत दाखल झाली होती. मेंदूच्या रक्तवाहिन्यांची ॲन्जीओग्राफी केल्यानंतर त्यांच्या मेंदूच्या रक्तवाहिनीवरती बेसीलर धमनी जी छोट्या मेंदूला रक्तपुरवठा करते त्या रक्तवाहिनीवरती फुगा होता. हा धमनीविकार खुपच किचकट स्वरुपाचा होता. ज्यास ओपन सर्जरी ज्यात मेंदूची कवटी बाजूला सारून क्लिपिंग करण्यासारख्या शस्त्रक्रिया शक्य नव्हत्या. रुग्णास कन्टूर डिव्हाईस ही आधुनिक शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. अश्विन वळसणकर, भुलतज्ज्ञ डॉ. भुषण मोहरीर, डॉ. संजय इथापे यांनी शस्त्रक्रियेद्वारे धमनीविकार पूर्णपणे बंद केला. मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे वेगवेगळे आजार असतात.
सर्वसाधारणपणे मेंदूची धमनी फुटल्यामुळे रक्तस्त्राव होऊन आधुनिक उपचारपध्दती न मिळाल्याने १०० पैकी ४० ते ४५ टक्के रुग्णांच्या जीवाला धोका होऊ शकतो. धमनीविकार आजारासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. यात ओपन शस्त्रक्रिया ही सर्वात जुनी पद्धत आहे. परंतु गेल्या १० ते १५ वर्षापासुन बिनटाक्याची आधुनिक शस्त्रक्रिया उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने एन्युरिझम कॉईलिंग ही उपचारपद्धत आहे. काही धमनीविकारात ही शस्त्रक्रिया करणे अशक्य असते. अशा रुग्णांसाठी कन्टूर डिव्हाईस एम्बोलायझेशन ही बिनटाक्याची आधुनिक शस्त्रक्रियेचा पर्याय आहे. यामध्ये कन्टूर म्हणजे एक अर्धगोल डिव्हाईस असते. जो तो डिव्हाईसेस आपण धमनिविकाराच्या फुग्यमध्ये सोडुन देतो आणि ह फुगा त्या डिव्हाईसेस मुळे बंद होतो.