
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
प्रा.मिलिंद खरात
शहापूर तालुका :- आज शनिवार दिनांक 8/1/20222 रोजी शेई विभाग हायस्कुल शेई ता शहापूर, जिल्हा-ठाणे येथे विद्यालयातील 15वर्षा वरील विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व आरोग्य कर्मचारी व विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर देऊन सोशल डिस्टन्स ठेऊन बसाविण्यात आले व आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती दिली व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कॅम्प मध्ये इयत्ता 9वी व 10वी च्या 15वर्षे पूर्ण झालेल्या -60 विद्यार्थ्यांना कोविड लस देण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र शेरे,अंबर्जे येथील कर्मचारी,डॉ.पूजा गांगुर्डे (एच.ओ.शेरे),के के पाटील, आय ए शेख, जयश्री कटके (अंगणवाडी कार्यकर्ती),मंजू डोंगरे(अंगणवाडी कार्यकर्ती),रेश्मा भंडारी (आशा वर्कर),संगीता तारमळे (गट प्रवर्तक),कमलाकर घरत, श्रीमती भेरे(आरोग्य सेविका) इत्यादी उपस्थित होते.
तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक श्री.उत्तम आव्हाड सर, जेष्ठ शिक्षक श्री ज्ञानदेव पिंपळसे सर,वसंत धनगर सर,मारुती सुरोसे सर,श्री.शंभूराव सोनवणे सर,तसेच श्री.सुनील निचिते सर, विजय पवार सर, गणेश आंधळे सर,अमित उमतोल सर, योगेश तारमळे सर,नितीन तारमळे सर,धीरज विदे सर सौ.शेंडे मॅडम, कु.रोहिणी मॅडम,शिक्षकेतर कर्मचारी श्री.राजाराम तारमाळे,कोंडीबा माने,अशोक रेरा या सर्वांनो विशेष मेहनत घेऊन लसीकरण मोहीम यशस्वी केली.