
दैनिक चालू वार्ता
नळगीर प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
शीख समुदायाचे 10 वे गुरू गोविंद सिंगजी यांचे कनिष्ठ चिरंजीव साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग, यांनी केलेल्या सर्वोच्च आणि अतुलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ भारत सरकारने 26 डिसेंबर हा दिवस “वीर बाल दिवस” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 26 डिसेंबर, 1705 रोजी शीख धर्माच्या प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी अनुक्रमे 9 आणि 6 वर्षांच्या कोवळ्या वयात त्यांनी आपले बलिदान दिले होते. न्याय मिळवण्यासाठी साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग या कोवळ्या मुलांनी दाखवलेले महान शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला कृतज्ञ राष्ट्राने आणि इथल्या जनतेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात केलेले हे वंदन आणि आदरांजली आहे