
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- गेल्या चारच दिवसात कोरोनाचा आकडा दिवसागणिक झपाटयाने वाढत आहे.शनिवारी ८२ रूग्ण दिल्यानंतर दुस-याच दिवशी रविवारी कोरोनाने १४७ रूग्ण दिले असून या नव्या रूग्णांनी थेट दिड शतक गाठले आहे. तर सध्या अॅक्टीव अशा चारशे रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली आहे.गेल्या काही दिवसात कोरोनाचे आपले रंग दाखविण्यास पुन्हा सुरूवात केली आहे.प्रारंभी केवळ चार,पाचवर राहणारा आकडा आता झपाटयाने वाढत आहे.
मागील तीन दिवसात शुक्रवारी ७३,शनिवारी ८२ रूग्ण वाढले होते. तर रविवारी कोरोना विषाणूने कहर करीत एकूण १४७ नवीन कोरोना बाधीत रुग्णांची भर घातली आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार रविवारी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर नांदेड मनपा विलगिकरणातून ७, खाजगी रुग्णालय १,जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७ हजार ९१७ झाली आहे.
उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९६.६३ टक्के आहे. सापडलेले नव्या कोरोना रुग्णात नांदेड मनपा ८२,मुदखेड ३,कंधार ६,नांदेड ग्रामीण ६,किनवट ५,धमार्बाद १,नायगाव २,अधार्पूर ४, लोहा ५, हिंगोली-०१,मुखेड ३,बिलोली ६,माहूर ५,भोकर १ देगलूर ५,हदगाव १,परभणी ६,पुसद १, उस्मानाबाद -०१,आदिलाबाद १,लातूर १ असे आहेत. रविवारच्या १३६३ अहवालांमध्ये ११६० निगेटिव्ह आणि १४७ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०९८१ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ११२ आणि २५ अँटीजेन तपासणीत असे एकूण १४७ रुग्ण नवीन सापडले आहेत.
आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ४५ आहेत. ११ स्वॅब अनिर्णीत राहिलेले आहेत. कोरोनाचे २७२ अॅक्टीव्ह रुग्ण असून मनपा अंतर्गत गृहविलगिकरण ३०९, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण ६७,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी २२, खाजगी रुग्णालयात १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड १ असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ४ रुग्ण आहेत.