
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नवीन नांदेड :- विना औषध गोळी शरीरातील रक्त संचालन सुरळीत करून अनेक रोगापासून कायम मुक्ती देण्यासाठी वापरले जाणारी व आजच्या काळाची गरज असलेली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बॉडी मसाज करणारे बालाजी बॉडी मसाज सेंटर ची नवीन कौठा भागात सुरुवात करण्यात आली. औषधा चा भडिमार वापर या मुळे होणारे दुष्परिणाम या पासून मुक्ती देणारे अत्यत सोप्या पद्धतीने शारीरिक आजार विशेषतः अर्धांग वायू या आजारासाठी रामबाण उपाय असलेली उपचार पद्धती म्हणजेच बॉडी मसाज होय या क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करून हजारो रुग्ण बरे करणारे बालाजी लिंबापुरे यांनी नवीन कौठा भागात बॉडी मसाज सेंटर सुरू केले ज्याचे उदघाटन महापौर प्रतिनिधी निलेशभाऊ पावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुखपाहुणे म्हणून शादुल्ला खान सचिव शिफा एज्युकेशन सोसायटी, डॉ. अवधुत पवार अधेक्ष शिवशाहू प्रतिष्ठान, डॉ.संभाजी पवार संचालक पुजा हेल्थकेअर सेंटर, डॉ मेघराज घुस्से संचालक गुरुनानक पेन मॅनेजमेंट, महारुद्र स्वामी,सुरेश भराडीया ,निलेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बालाजी लिंबापुरे यानी बॉडी मसाज चे महत्त्व व आपले अनुभव सांगितले. सूत्र संचालन मेघा शिराळे यांनी केले व आभार बालाजी लिंबापुरे यांनी मानले.