
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
शिराढोण :- येथील ग्रामीण भागातील पत्रकार कै. गोपीनाथ पवार यांच्या मोटारसायकल चा अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. आदरणीय गोपीनाथ पवार यांनी कशाचीही अपेक्षा न करता गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावलेले होते. त्यांच्या या चांगल्या स्वभावामुळे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांना फक्त शिराढोण च नव्हे तर संपुर्ण कंधार व लोहा तालुका ओळखत होता. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबियावर खूप मोठा दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. पवार कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.