
दैनिक चालु वार्ता
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
विश्वास खांडेकर
नांदेड :- जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड येथे आज दि.०७ जानेवारी २०२२ रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पंधरा वर्षांवरील शालेय विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. आज दि.०७ जानेवारी २०२२ रोजी तब्बल ५७० विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.
या लसीकरण मोहीमेत डी.एस.भुरेवाड,सुरेश आरगुलवार,वैशाली वाघमारे,गंगा घाटे,शेवंता सोनसळे,सावित्रा कोतेपल्लू,सुरेखा सातव,पुष्पा डोंगरे, पुष्पा गायकवाड, ज्योती असणे,भीमा जमदाडे यांनी लसीकरण मोहीमेत सहभाग नोंदवला.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रा.व्ही.के.हंगरगेकर सर, उपमुख्याध्यापक रवी जाधव साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक एन.एम.भारसावडे, प्रा. बी .ए. शिंदे, प्रा.एस .एम. देवरेसौ.के.पी.पल्लेवाड,सौ.ए.जी.देगावकर,एस.आर.बिरगे,व्हि.ब.वाकडे,एस.एम.मुदीराज,एस.आर.भोसीकर,एस.एन.शिंदे,बी.के.सुब्बनवाड,सौ.ए.के.जांबकर,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक डी.जी.पवार, एन.पी.जाधव, ए.डी. मोरे,डी.जी.सुर्यवंशी,ए.के.कंकरे,एस.डी.शिंदे,बी.बी.पाटोळे, एस. एन.देवकर ,गजानन उके,शंकर कापसे,राम विजापूरे यांनी मोहीम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.