
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
मंठा / दि.09 :- मंठा तालुक्यातील हेलस या गावी सलग 3 वर्षापासून राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे या वर्षीही हेलस येथे सर्व कोरोनाचे नियम पाळून संभाजी ब्रिगेड हेलस शाखेच्या वतीने व श्री स्वामी समर्थ रक्तपेढी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी 30 पेक्षाही अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले, कार्येक्रमाचे अध्यक्ष म्हणून हेलस चे चेअरमन दिपक भाऊ खराबे यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्येक्रमास सुरुवात केली तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आलेले मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे सर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश घारे मंठा तालुकाध्यक्ष बाळासाहेब खवणे व सर्व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्येकर्ते, जिजाऊ भक्त, गावकरी उपस्थित होते.