
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- दि.९ रोजी सावरगाव नसरत येथे आनंद कंधारे यांनी सावरगाव नसरत तालुका लोहा जिल्हा नांदेड परिसरातील तरुण, विध्यार्थी नागरिकांची गरज ओळखून देवा हेल्थ क्लब या नावाने व्यायामशाळेची स्थापना केली.त्याचा उद्घाटन सोहळा प्राध्यापक संजय बालाघाटे यांच्या हस्ते फीत कापून पार पडला. नव वर्षाचे औचित्य साधून सावरगाव नसरत चे भूमिपुत्र आनंद गंगाधर कंधारे यांनी तरुण, विध्यार्थी यांची गरज ओळखून देवा हेल्थ क्लब ची स्थापना केली.
लोहा – आस्टुर मार्गावरील अनेक गावांना याचा लाभ होणार आहे. जास्तीत जास्त माणसे निरोगी राहावेत, तरुणांना आपल्या करीयरच्या वाटा शोधण्यास मदत व्हावी या उद्देशाने हेल्थ क्लब ची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी नांदेड पोलीस दलातील पो. कॉ. अलीम शेख यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
या उद्घाटन सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल शेटकर सावरगाव सोसायटी चे चेअरमन बालाजी कदम, पो.कॉ. अलीम शेख ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजू भावे, ग्रा.प.सदस्य प्रा.गोविंद कोपनर, प्रा.चंद्रकांत बेद्रे प्रा.मन्मथ शेंबाळे, कदम सर, संतोष हाके, बापूराव देवकते, सतिश कदम सावरगाव नसरत ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सावरगाव,हूलेवाडी करेवाडी, कोस्टवाडी, हरणवाडी, मुरंबी, लोहा येथून अनेक तरुण मंडळी व कंधारे परिवारातील सर्व सदस्य उपस्थीत होते.
यावेळी प्राध्यापक संजय बालाघाटे यांनी देवा हेल्थ क्लब चे कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.प्राध्यापक गोविंद कोपनर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.व्यायामशाळा हा व्यसनाधीनता रोखण्याचा व व्यक्तिमत्व विकासाचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक गोविंद कोपनर यांनी यावेळी केले. आनंद कंधारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.