
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
उमरी :- आज वागलवाडा येथे 16वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन शेतकरी नेते स्वागताध्यक्ष मारोती पाटील कवळे गुरुजी सी.ई.ओ.संदीप पाटील कवळे,संयोजक दिगंबर गं.कदम,सरव्यवस्थापक एस. जी.आंबटवार होते.या संमेलनाचे उदघाटक सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.प्रल्हाद लुलेकर,कार्यक्रमाचे संयोजक दिगंबर गुरुजी करकाळेकर अमरनाथ राजूरकर,मोहनराव हंबर्डे, डी. पी.सावंत,वसंत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात संवेदना साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन,स्वाती कान्हेगावकर यांच्या पाण्यावरच्या गायी या कथासंग्रहाचे प्रकाशन,राम गायकवाड लिखित उन्हाचा कहर कोलताना या काव्यसंग्रहाचे प्रकाशन,संतोष चमकुरे यांच्या गाव पुन्हा बांधताना या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी सकाळी 10 वाजता ग्रंथ प्रदर्शन उदघाटन सकाळी 10:15 वाजता संतोष तळेगाव यांचे चित्र प्रदर्शन व बालाजी पेटेकर यांच्या शिल्पकृती, नाणी संग्रहाचे प्रदर्शन व उदघाटन दुपारी 2 वाजता परिसंवाद विषय नितीमुल्य संवर्धनासाठी संतसाहित्याची गरज दुपारी 3 वाजता कथाकथन व सायंकाळी 5:30 वाजता कविसंमेलन झाले.
तसेच लोकसंवाद पुरस्काराचे वितरण झाले.या पुरस्काराचे मानकरी अडव्हकेट शिवाजीराव हाके (जेष्ठ विधिद्य)जीवन गौरव पुरस्कार,शंतनू डोईफोडे संपादक दै.प्रजावणी,संतोष पांडागळे दै. सत्यप्रभा,प्राचार्य अशोक गवते पाटील शैक्षणिक व सामाजिक,संभाजी बिरादार शैक्षणिक व सामाजिक,दशरथ पाटील शैक्षणिक व सामाजिक विलास सिंदगीकर साहित्य,प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर कथा,डॉ.संभाजी पाटील वैद्यकीय,प्रा.डॉ.कुमार आनंदगावकर शैक्षणिक,मीनाक्षी आचमे चित्तरवाड शैक्षणिक,भगवान लक्ष्मणराव ढगे कृषी आदी मानकरिंना पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला.यावेळी जिल्ह्यातील व परिसरातील असंख्य साहित्यिक,कवी आणि विचारवंतांची मंदियाळी जमा झाली होती.