
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
जालना :- जालना शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची झोप उडाली असतानाच आज रविवारी जालना जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढलून आल्याने प्रशासना समोरील अडचणीत भर पडली आहे. दुबई येथून जालन्यात १ जानेवारी रोजी परतलेल्या एका व्यक्तीचा लाळेचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. सदर अहवाल आज रविवारी ओमायक्राँन बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांनी दिली आहे.