
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
मलकापूर :- दि.9 सद्गुरु बार्बर शॉप मलकापूर तालुक्यातील सर्वात मोठे केश कर्तनालयाचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते करण्यात आले. मलकापूर तालुक्यातील सर्वात मोठे अद्ययावत असे महानगरांच्या तोडीचे जेंट्स पार्लर आहे. भव्य दिव्य अशा स्वरूपाचा उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला. शंकर वाघ यांनी सुसज्ज असे केसकर्तनालय सुरू केले हे अभिमानाची बाब आहे. त्यांचे वडील विष्णू वाघ त्यांच्या प्रेरणेने शॉप सुरू झाले आहे.
ग्रामीण भागातील तरुण मुले सरधोपट मार्ग न धरता वेगळ्या वाटा निवडत आहे. याचे कौतुक वाटते.त्यांना प्रोत्साहन देण्याकडे नेहमीच कल असतो. अशा पद्धतीने नव्या संधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न ग्रामीण भागातील मुलांनी करत राहायला हवा असे मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले. या उद्घाटन प्रसंगी मलकापूर नगराध्यक्ष एड. हरीश रावळ, आरपीआयचे भाई अशांत वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष रायपुरे, माजी नगराध्यक्ष वीजयराव जाधव, माजी नगराध्यक्ष अरुण अग्रवाल, रावसाहेब देशमुख, अमोल राजपूत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.