
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी किनवट
किनवट :- भारताच्या शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या फातिमा शेख यांची १९१वी जयंती इस्लापुर रेल्वे स्टेशन येथे डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर साजरी करण्यात आली. यावेळी इस्लापुरच्या प्रथम नागरिक महिला सरपंच शारदा अनिल शिनगारे यांच्या हस्ते फातिमा शेख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी पँथर दत्तादादा गड्डलवाड व विकास लोखंडे सर कोल्हारीकर यांनी फातिमा शेख यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमास उपस्थित सरपंच शारदा अनिल शिनगारे
पँथर दत्तादादा गड्डलवाड,विकास लोखंडे सर कोल्हारीकर,
जगदीप हनवते, अनिल शिनगारे, गौरव कदम,सुमेध गव्हाळे,तोफीक पटेल, मोहम्मद शहेबाझ अक्षय शेरे, किशोर भवरे, सुमेध कसबे,रोहित तिगोटे, प्रविण पवार,सुनिल वानखेडे,
या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन अक्षय शेरे यांनी केले
व आभार प्रदर्शन तोफीक पटेल यांनी मांडले.